पुणे - औंधमधील विधाते वस्ती परिसरात दहशत माजवीत गुंड टोळक्याने दोघांवर हत्यारांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. या टोळीतील सराईत गुन्हेगार अमीर अल्लाउद्दीन शेख आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.