nilesh ghaywal sachin ghaywal
sakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश गायवळ (घायवळ)चा भाऊ सचिन गायवळ याच्यावरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गायवळच्या शस्त्र परवान्याचा मुद्दा चर्चेत असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.