'डिक्की'मार्फत एक लाखाहून अधिक लोकांना जेवण आणि रेशन किट्स

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे गरजू नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे गरजू नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
Updated on

पुणे - संपूर्ण देशात कोरोना विषाणूनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून देशभरात 'लॉकडाऊन' जाहीर करण्यात आले. परिणामी बाजारपेठा, कंपन्या, कारखाने बंद ठेवण्यात आल्यामुळे हातावरचे पोट असणारे मजूर, रस्त्यावर राहणारी कुटुंबे, पुण्यात अडकलेले विद्यार्थी यांना 'लॉकडाऊन' चा सर्वाधिक फटका बसला. अशा परिस्थितीत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. व या मजूर वर्गासाठी तसेच बेघर लोकांच्या जेवणाची व्यवस्था कशी करता येईल या संदर्भात चर्चा केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या या प्रयत्नांमुळे, कोरोना विरुद्धच्या या लढाईत काम करण्याची परवानगी त्यांनी मिळवली. यानंतर सीओईपीचे संचालक भारत आहुजा यांची भेट घेऊन 'कम्युनिटी किचन' सुरु केले. या उपक्रमा अंतर्गत एमएसएमई आणि 'स्टार्ट अप' उद्योजकांचे गट तयार करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी व गरजू लोकांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त, पुणे यांच्या साहाय्याने योजना आखण्यात आली. ससून रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांच्या जेवणाची सोयीसाठी डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह (आयबी) येथे डॉक्टरांसाठी दुसरे किचन सुरु करण्यात आल्याची माहिती डिक्कीचे पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अनिल होवाळे यांनी दिली.

आमच्या या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 2400 ते 2600 अन्न पाकिटे तयार होतात. शहरातील झोपडपट्टीमधील रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी तसेच पुणे जिल्ह्यमधील अतिदुर्गम भागात 200 ते 300 रेशन किट वाटण्यात आले. आज पर्यंत शहरात 85 हजार 103 इतके फूड पॅकेट आणि 13 हजार 520 रेशन किट वाटण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण एक लाख 39 हजार 186 नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे असे अनिल होवाळे यांनी सांगितले.

या उपक्रमात राजेश बाहेती, राजू साळवे, अमित औचरे, किशोर ढोकळे आदींनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com