
बोर्डाच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, या परीक्षा अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने नेमलेल्या या समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील हे अध्यक्षस्थानी आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सल्लागार समिती ठरविणार उपाययोजना
पुणे : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेताना नेमक्या काय संभाव्य अडचणी असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, हे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने सल्लागार समिती नुकतीच स्थापन केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही समिती सल्ला देणार आहे. समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार बोर्डाच्या परीक्षा अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकारमार्फत पावले उचलली जाणार आहेत.
बोर्डाच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, या परीक्षा अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने नेमलेल्या या समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील हे अध्यक्षस्थानी आहेत. तर राज्य मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. वसंत काळपांडे, सेवानिवृत्त विभागीय अध्यक्ष विनय दक्षिणदास, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, कात्रज येथील कै. पै. हिरामण बनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड, सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेचे उपशिक्षक नितीन म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल. एम. पवार, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले हे सदस्य आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या समितीची एक बैठक नुकतीच झाली असून त्यात परीक्षेदरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच या अडचणी सोडविण्यासाठी काय पावले उचलणे अपेक्षित आहे, यावर देखील चर्चा झाली. समितीतील सदस्यांनी सुरक्षितरित्या परीक्षा घेण्यासाठी काय करायला पाहिजे, याबाबत उपाय सुचविल्याचे पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
‘‘कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता दहावी-बारावीच्या एप्रिल-मे २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा आणि पुरवणी परीक्षा २०२१ घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत सल्लागार समितीतील सदस्यांशी चर्चा केली जात आहे. या समितीत राज्य शिक्षण मंडळातील पदाधिकारी, शिक्षण संस्था चालक, शिक्षणतज्ञ, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक याचा सदस्य म्हणून सहभाग आहे. बोर्डाची परीक्षेत येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन, त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत समिती सदस्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.’’
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
Web Title: Measures Be Taken Advisory Committee 10th 12th Examination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..