esakal | पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या रोखणार? वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

pune-cantoment file pic

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी राम आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी नवीन मोदीखाना आणि भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली.

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या रोखणार? वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - भवानीपेठ क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांच्या धर्तीवर पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी राम आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी नवीन मोदीखाना आणि भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली. पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर या वेळी उपस्थित होते.

- प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही. तसेच, बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही.

- या भागातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यासाठी भाजीपाला, दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार.

loading image
go to top