

One Platform for Medical Aspirants: Seminars to Be Held in Five Cities
sakal
पुणे : वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना विद्यार्थी-पालकांच्या मनात ‘वैद्यकीय शिक्षण कोठे घ्यावे’, ‘भारतात की परदेशात एमबीबीएस करावे,’ ‘महाविद्यालय कसे निवडावे’, ‘फसवणूक करणाऱ्या एजंटपासून कसे वाचावे’, असे अनेक प्रश्न असतात. विद्यार्थी-पालकांच्या मनात असणाऱ्या अशा प्रश्नांच्या उत्तरांसह आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत संपूर्ण मार्गदर्शन ‘सकाळ विद्या’ यांच्यातर्फे ‘एमबीबीएस ॲडमिशन सेमिनार २०२६’ या सत्राद्वारे एकाच छताखाली मिळणार आहे.