

Used Needles and Medicine Bottles Dumped Openly on Paud-Kolwan Road
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : पौड करमोळी पुला जवळ पौड कोळवण रस्त्यालगत उघड्यावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया, सिरिंज, औषधांच्या बाटल्या आणि इतर वैद्यकीय साहित्याचा मोठा ढिग रस्त्याच्या कडेलाच बेजबाबदारपणे फेकण्यात आला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.