

The Narayangaon–Warulwadi bridge has been closed after severe flood damage, causing inconvenience to students and local residents.
Sakal
नारायणगाव : पुराच्या पाण्यामुळे नारायणगाव - वारूळवाडी या गावांना जोडणाऱ्या मीना नदीवरील नेवकर पुलाचे लोखंडी खांब असलेले कठडे, संरक्षक जाळ्या तुटून मोठे नुकसान झाले. पुलाच्या स्लॅब ला सुद्धा तडे गेले आहेत. पुल रहदारीसाठी बंद ठेवला आहे.या मुळे शालेय विद्यार्थी व दोन्ही गावातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. नारायणगाव व वारूळवाडी या दोन्ही गावातील वाढलेल्या लोक संख्येचा विचार करता नेवकर पुलाची उंची व रुंदी वाढवून नवीन पुल तयार करावा. अशी मागणी शालेय विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.