

Meena River Jalsamadhi protest demanding compensation for flood affected farmers in Narayangaon Pune
Sakal
नारायणगाव : मीना नदीला आलेल्या पुरामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. या प्रमुख मागणीसाठी इतर मागण्यांसाठी पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे मीना नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्राहक कल्याण फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुढील आठ दिवसांत आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत महसूल, तहसीलदार, जलसंपदा व भूमी अभिलेख विभागाची संयुक्त बैठक घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल.असे आश्वासन तहसीलदार रणजीत भोसले, कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण शिंदे यांनी दिले. त्या नंतर जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले.