भेटा, देशाच्या भावी अवलिया पंतप्रधानांना! (व्हिडिओ)

pune.jpg
pune.jpg

पुणे :  देशभर लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना, 2019 मध्ये देशाचा पंतप्रधान कोण होणार यावरील चर्चांना उधाण आले आहे. अशात "मी पंतप्रधान 2019' असा फलक, दान पेटी घेऊन प्रत्येकाकडून एक एक रुपया गोळा करत अपक्षांचे सरकार आणून, स्वतः पंतप्रधान होणार असल्याची स्वप्न पाहणारा अवलिया पुण्यातील रस्त्यांवर फिरत आहे.विजयप्रकाश कोंडेकर वय 73 वर्ष असे त्यांचे नाव असून ते मूळचे लातूरचे आहेत. यापूर्वीत्यांनी अनेक मोठ्या नेत्यांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत. महाराष्ट्र विद्युत महामंडळातील नोकरीतून निवृत्त झालेले कोंडेकर पुण्यातील बावधन परिसरात राहतात.

देशातील एकूण उत्पन्नाच्या मोठा हिस्सा सुरक्षा व्यवस्था आणि निवडणुकांवर खर्च होतो. तो रोखण्यासाठी केवळ सतराशे रुपयांमध्ये निवडणूक लढता येऊ शकते. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशांमध्ये निवडणुका म्हणजे विचित्र खेळ झाला आहे. मला आपल्या देशात अपक्षांचे सरकार आणण्याचा प्रयोग करायचा आहे.

आताचे राजकीय पक्ष निवडणुका जिंकून संसदेत मध्ये जातात. तिथे एकमेकांशी भांडून एकमेकांचे पाय ओढत असतात. त्यांना दुसरे काही नको असते. त्यांनी देश वाटून घेण्यास सुरवात केली आहे. युती आघाडीच्या नावावर ही जागा आमची, ती तुमची असे बोलले जात आहे. परतू, कोणती जागा कुणाची हे ठरवणारी जनता असते. असेही त्यांनी सांगितले.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com