कोरोना उपायोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून कोरोना निर्मूलन आढावा बैठक सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. तसेच, बाधित रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय उपाययोजना तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यावरील उपाययोजना तसेच, केंद्र सरकारच्या अनलॉक-3 नंतर नियमांमध्ये येणारी शिथिलता यासह विविध मुद्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून कोरोना निर्मूलन आढावा बैठक सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. तसेच, बाधित रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय उपाययोजना तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक-2 ची मुदत 31 जुलै रोजी संपत आहे. त्यानंतर येत्या एक ऑगस्टपासून सरकारकडून अनलॉक-3 ची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात लॉकडाउनमधील काही निर्बंध मागे घेत नियमांमध्ये आणखी शिथिलता आणली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरही बैठकीत चर्चा सुरू असल्याचे समजते.

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन! 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting on Corona measures begins in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar