Meetings Of MPs : सुस्त प्रशासनाला हलविण्यासाठी खासदारांच्या बैठका

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली.
Meetings Of MPs
Meetings Of MPs ESAKAL
Updated on

पुणे ः पुणे महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरु आहे. पण अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रश्‍न सोडविले जात नाही, वारंवार पाठपुरावा केला तरी त्यांना दाद देत नाहीत अशा स्थितीत नागरी समस्या सोडविण्यासाठी खासदारांनाच महापालिकेत येऊन प्रश्‍नांवर चर्चा करावी लागत आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेत शहरातील प्रश्‍नांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वतंत्रपणे बैठक घेतली आहे.

Meetings Of MPs
Nashik News: रस्त्यातील उघड्या गटारीत लाकडाचे ओंडके! सिन्नर-निफाड रस्त्यावर बारागाव पिंपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाखालील प्रकार

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे नगरसेवक नसल्याने प्रभागातील समस्या वाढत आहेत. पाणी टंचाईची समस्या, ड्रेनेज तुंबणे, कचरा उचलला न जाणे, पथदिवे बंद पडणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुविधा न मिळणे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार करणे यासह अनेक छोट्यामोठ्या समस्या नागरिक नगरसेवकांकडे मांडून विषय मार्गी लावून घेत होते. मतदार नाराज होऊ नये यासाठी नगरसेवक प्रशासनाकडून कामे करून घेत होते. पण गेल्या अडीच वर्षापासून नगरसेवकाअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.

Meetings Of MPs
Vasant More News: पक्षप्रवेश देताच ठाकरेंनी वसंततात्यांना शिक्षाही सुनावली...

सध्या माजी नगरसेवकांकडे नागरिक सध्या तक्रारी घेऊन गेल्यानंतर या माजी नगरसेवकांना प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही अशी स्थिती आहे. अधिकाऱ्यांना भेटून कामे मार्गी लागत नाहीत. नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी त्यांचे निरसन होत नाही. हा त्रास समाविष्ट ३४ गावांमध्ये जास्त असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दर महिन्याला महापालिकेत आढावा बैठक घेऊन समस्या सोडविण्यावर भर देत आहेत. त्याच प्रमाणे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनीही शहरातील समस्यांवर बैठकी घेतली. यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या भागातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर लेखी निवेदन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर त्वरित कार्यवाही करत समस्या निवारण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Meetings Of MPs
Nashik Crime News : महिला पोलिस कर्मचाऱ्यास तरुणाकडून मारहाणीचा प्रकार! दहिपुलावरील घटना

डॉ. अमोल कोल्हेंचा जनता दरबार

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात हडपसर विधानसभेतील हडपसर आणि वानवडी रामटेकडी या दोन क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. या भागातील पाणी, रस्‍ते, कचरा, ड्रेनेज यासह अन्य नागरी विषयांवर जनता दरबार आयोजित केला होता. तेथे नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर आज कोल्हे यांनी महापालिकेत आयुक्तांकडे बैठक घेतली. या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, विभाग प्रमुखांसोबत चर्चा केली.

‘‘नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नाही. हडपसर आणि वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरी समस्यांवर जनता दरबार घेतला होता. त्यावर आज महापालिकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्यास सांगण्यात आले आहे.’’

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.