Police and Forest Department Joint Investigation Underwa
Sakal
शिरूर : सोनेसांगवी (ता. शिरूर) येथे आज सकाळी १४ वर्षीय दिव्यांग मुलगी आपल्या झोपडीमध्ये मृतावस्थेत आढळल्याने व तीच्या मांडीचे आणि गळ्याचे गंभीर लचके तोडल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. हा हिंस्त्र प्राण्याचा हल्ला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी तो बिबट्याचा, भटक्या कुत्र्यांचा की इतर हिंस्त्र श्वापदाचा या निष्कर्षाप्रत पोलिस अद्याप आलेले नाहीत. पोलिस व वनविभाग या प्रकरणी संयुक्त चौकशी करीत आहेत.