esakal | जो घाबरला तो भाजपमध्ये गेला- मेहबूब शेख
sakal

बोलून बातमी शोधा

जो घाबरला तो भाजपमध्ये गेला- मेहबूब शेख

शोले चित्रपटाचा ऐक डायलॉग होता गब्बर सिंगचा जो डर गया वो मर गया, आज जो डर गया वो भाजप मै गया, अशी अवस्था झाली असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केले.

जो घाबरला तो भाजपमध्ये गेला- मेहबूब शेख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शोले चित्रपटाचा ऐक डायलॉग होता गब्बर सिंगचा जो डर गया वो मर गया, आज जो डर गया वो भाजप मै गया, अशी अवस्था झाली असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केले.

आज (ता.30) मावळ जिल्हा पुणे येथे राष्ट्रवादी युवकच्या नवनियुक्त कार्यकारणीचे स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन माजी उनगगराध्यक्ष किशोर भाई भेगडे यांनी केले होते. यावेळी मेहबूब शेख यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी कार्याअध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रीय सचिव डॉ. शलेश मोहीते पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाअध्यक्ष सचिन घोटकुळे, संतोष भेगडे तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मेहबूब शेख यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका करताना आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे सांगितले. संकटातही कार्यकर्त्यांची नवी फळी मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

loading image
go to top