esakal | उत्तर प्रदेशातील घटनेचा बारामतीतील मेहतर समाजबांधवांकडून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर प्रदेशातील घटनेचा बारामतीतील मेहतर समाजबांधवांकडून निषेध

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या घटनेचा बारामतीत मेहतर वाल्मिकी समाजाकडून निषेध करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील घटनेचा बारामतीतील मेहतर समाजबांधवांकडून निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व तिची हत्या हा माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार असून, सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गुरुवारी बारामतीत करण्यात आली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या घटनेचा बारामतीत मेहतर वाल्मिकी समाजाकडून निषेध करण्यात आला. येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशातील ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुलीवर अत्याचार करून तिची जीभ कापत, मानेची हाडे मोडण्यात आली. तसेच, पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेची सखोल चौकशी करावी,  हा खटला उत्तर प्रदेशाबाहेर विशेष न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मेहतर वाल्मिकी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. धीरज लालबिगे, आनंद लालबिगे, अजय लालबिगे, संजय मुलतानी, गोपाल वाल्मिकी, प्रदीप लालबिगे, योगेश लालबिगे, धर्मेंद्र कागडा, मुकेश वाघेला, बलवंत झुंज, परवेश बागडे, अतिश लालबिगे, साजन लालबिगे, नीलेश बागडे, रणधीर लोटार, ओंकार देवकाते, आकाश वाडीले आदी उपस्थित होते.