दुसऱ्याचे शेत वाट्याने  घेऊन  खरबूज शेतीचा वांगींच्या चौधरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

दुसऱ्याचे शेत वाट्याने घेऊन खरबूज शेतीचा वांगींच्या चौधरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

Published on

प्रेरणादायी

CKL26B02907
वांगी (ता. करमाळा) ः येथील अमोल व दत्तात्रय चौधरी खरबूज पिकाचे तोडणी करताना.

वाट्याने शेत घेऊन अडीच एकरात १२ लाखांचे खरबुजाचे पीक
वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन उत्पादन; उत्तम व्यवस्थापनातून केली अडचणींवर मात

सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. २२ ः केळी पिकातील तोट्याने आर्थिक संकट ओढावले; मात्र हार न मानता पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेत वांगी (ता. करमाळा) येथील चौधरी बंधूंनी चुलत्याचे क्षेत्र वाट्याने घेऊन अवघ्या दोन महिन्यांत अडीच एकरातून तब्बल १२ लाखांचे खरबूज उत्पादन घेत यशाची गोड कहाणी घडवली आहे. जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर साधलेले हे यश परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्वास निर्माण करणारे ठरत आहे.

वांगी नंबर दोन येथील अमोल चौधरी व दत्तात्रय चौधरी चुलत बंधू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वडिलोपार्जित शेती करतात. केळी पिकामध्ये दोघांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. आपण पीक बदलले पाहिजे असा दोघांचा विचार झाला. खरबूज पीक चांगले उत्पन्न मिळवून देईल यावर एकमत झाले. परंतु घरच्या शेतामध्ये सध्या क्षेत्र शिल्लक नव्हते. दोघांनी चुलते बळीराम चौधरी यांचे अडीच एकर क्षेत्र वाट्याने घेऊन या क्षेत्रावर खरबुजाची लागवड केली.
दोन महिन्यांत उत्तम खत, पाणी व्यवस्थापन करत जोमदार खरबुजाचे पीक उभे केले. सध्या अडीच एकर क्षेत्रामध्ये ५० टन उत्पादन पहिल्या तोड्याला निघाले. २२ रुपयाचा दर ठरवून ११ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर उर्वरित शिल्लक राहिलेल्या खरबुजांपासून एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
शेती करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन, पाणी, भांडवल मार्गदर्शन जवळ नसतानाही जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर खरबूज शेतीचा त्यांनी केलेला यशस्वी प्रयोग या परिसरातील इतर तरुण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com