गराडे (जि. पुणे) - ‘जगाच्या इतिहासात एकही युद्ध न हरणारा व स्वतःच्या बुद्धितेजाने चार ग्रंथ लिहिणारे तेजोमय प्रखर विद्वान पंडित छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा. यासाठी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांना साजेसे स्मारक उभारले जाईल,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.