

organ donation
sakal
पुणे - अवयवदानात महिलांच्या तुलनेत पुरुषांचा टक्का अधिक असल्याचे पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) आकडेवारीवरून समोर आले आहे.
गेल्या वर्षभरात पुणे विभागात ७९ मेंदूमृत (ब्रेनडेड) दात्यांच्या नातेवाइकांनी अवयवदान केले असून त्यापैकी पुरुषांची संख्या ५७ (७२ टक्के), तर स्त्रियांची संख्या २२ (२८ टक्के) आहे. या अवयवदानामुळे २०७ रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.