

पुणे, ता. ११ : ‘‘मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे, त्याविषयी मोकळेपणाने संवाद साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला संकोच दूर करणे ही काळाची गरज आहे,’’ असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वूमन येथील मानसशास्त्र विभाग आणि सृजन सायकोलॉजिकल सेंटर यांच्यातर्फे ‘मन-संवाद : वास्तव आणि दिशा’ कार्यक्रम झाला. या वेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे आदी उपस्थित होते. गोडबोले यांनी बदलती सामाजिक परिस्थिती, चंगळवाद आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटकांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट केला. आगामी काळात भारतासह जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रासमोर उभी राहणारी आव्हाने, वाढती गरज आणि उपलब्ध मानसिक आरोग्य सेवांची मर्यादा यावर त्यांनी भाष्य केले. डॉ. व्हनकटे यांनी मोबाइलच्या वाढत्या वापराचा माणसाच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, बदलत्या परिस्थितीत मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता भडगावकर यांनी, तर सूत्रसंचालन अमृता पोतनीस यांनी केले. संस्कृती जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.