

‘वायसी’च्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन
सातारा, ता. २४ ः विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, परीक्षेचा व दैनंदिन जीवनातील ताण प्रभावीपणे हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे, तसेच आत्महत्या प्रतिबंधाबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झालेल्या ‘जागर आरोग्याचा : मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.
उपक्रमात यशवंतराव चव्हाण मुलांच्या वसतिगृहातील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य संवर्धन आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जागरूक राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. डी. डी. नामदास, डॉ. जय चव्हाण, उपप्राचार्य प्रा. डॉ. उदय शिंदे आणि डॉ. संग्राम नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) अपर्णा संभुदास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मानसिक ताणाची कारणे, ताण ओळखण्याची लक्षणे, तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्याच्या प्रभावी पद्धती, सकारात्मक विचारसरणी, भावनिक संतुलन आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. समुपदेशक ऋषिकेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशनाचे महत्त्व सांगितले. प्रा. स्मितेश सतीश नलगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.