अल्पवयीन गतिमंद मुलीकडून एका मुलीचा खून; कोथरूडमध्ये घडली धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : गतिमंद मुलीला एका अल्पवयीन गतिमंद मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी पावणे पाच वाजता कोथरुडमधील एका गतिमंद मुला-मुलींच्या संस्थेमध्ये घडली.

ममता मोहन डोंगरे (वय 33) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिता टापरे यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये सावली गतिमंद आणि बहुविकलांग प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. संबंधित संस्थेध्ये गतिमंद आणि विकलांग मुला-मुलींचा सांभाळ केला जातो.

Breaking: शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत मोठा निर्णय​

दरम्यान, शुक्रवारी ममता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रॅम्पवर चालत होती. त्यावेळी अल्पवयीन मुलीने ममताला पाठीमागून येऊन पकडून दुसऱ्या मजल्यावर नेले. त्यानंतर तिला तेथून ढकलून देत तिचा खून केला. फिर्यादी टापलरे यांनी या घटनेची पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर कोथरुड पोलिस घटनास्थळी आले. अल्पवयीन मुलगी ही मुंबई येथील आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एल. घोडके करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mentally retarded girl pushes another girl off the second floor incidence held in Kothrud