Pune Crime News | पुण्यात ११ लाखांचे ड्रग्ज जप्त, राजस्थान कनेक्शनचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cocaine Drug

पुण्यात ११ लाखांचे ड्रग्ज जप्त, राजस्थान कनेक्शनचा पर्दाफाश

पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने १२ लाखांचे म्याव म्याव ड्रग्स म्हणजेच एमडी (Mephedrone Drugs) पकडले आहेत. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यात एका अंमलीपदार्थ तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

या प्रकरणात एकाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महंमद फारुख महंमद उमर टाक असे अटक केलेल्या तस्कराचे नावं असून तो मूळचा राजस्थानचा आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात एक इसम येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार महंमद टाक याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. यानंतर ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी प्रकारचे ड्रग्ज आढळून आले आहेत.

त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त केले असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Mephedrone Drugs Seized In Pune Pune Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top