

Pay Cuts and Promotions for Employees from Merged Villages
Sakal
मांजरी : चार वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंचे वेतन कपात करून काहींची पदावनतीही करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून राबविण्यात आलेले हे धोरण अत्यंत अन्यायकारक असल्याची तक्रार या कामगारांनी केली असून आयुक्त कार्यालयाकडे त्याबाबत दाद मागितली आहे. याबाबत आयुक्तांनी पुन्हा पडताळणीचे आदेश देवून अहवाल मागविला आहे. चार वर्षांपूर्वी तेवीस गावांच्या समावेशाबरोबर तेथील कर्मचाऱ्यांचाही पालिका प्रशासनात समावेश झाला आहे. जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून हा अहवाल महापालिकेकडे सुपूर्द केला होता.