पुणे शहरातील गारठा आठवडाभर कायम

पुणे शहरातील गारठा आठवडाभर कायम

पुणे - शहरातील गारठा पुढील आठवडाभर तरी कायम राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शिवाजीनगर येथील वेधशाळेत सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

राज्यातील सर्वच भागात कोरडे हवामान झाल्याने थंडी वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानात चढ-उतार झाले होते. मात्र, आता पुन्हा काही भागात थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान सरासरी तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. शहर परिसरातही हवेतील गारठा वाढला असून, पहाटे आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. दरम्यान, अरबी समुद्र व मालदीव या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीजवळील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होणार आहे. त्यामुळे या भागात गुरुवारी काही प्रमाणात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक सरी पडतील. तसेच बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि हिंदी महासागर व दक्षिण अंदमानात पुन्हा चक्रीवादळासाठी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर अंतरावर पोषक हवामान तयार होण्याचे संकेत हवामान खात्याने संकेत दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com