
शहरात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ५९४मिलिमीटर पावसाची नोंद झाली.१जून ते३० ऑगस्टपर्यंत शहरात५९४.२मिलिमीटर पाऊस पडला. यंदा सरासरीपेक्षा१५८. मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद
पुणे - पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली. शहरात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ५९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत शहरात ५९४.२ मिलिमीटर पाऊस पडला. यंदा सरासरीपेक्षा १५८.४ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
मध्य प्रदेशच्या पश्चिम भाग ते राजस्थानच्या पूर्व भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची तीव्रता कमी होऊ लागली आहे. तसेच राजस्थानच्या परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय मॉन्सूनचा आस जैसलमेर व मध्य प्रदेशच्या पश्चिम भाग व पूर्व राजस्थान, चुर्क, पटना, गोलपारा ते नागालॅंडपर्यत सक्रिय आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दक्षिण उत्तर तमिळनाडू ते कोमोरिन परिसर व रायलसिमाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यात अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हलक्या सरींची शक्यता
राज्यात पुढील काही दिवस हलक्या सरी पडतील, तर अनेक ठिकाणी पावसाची ढगाळ वातावरणासह उघडीप, तर कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ हवामानासह काही प्रमाणात ऊन पडेल. पुणे परिसरात व घाटमाथ्यावर हलक्या पावसाचा शिडकाव होईल.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस
पुण्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० जास्त पाऊस पडला. जूनमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती; पण जुलैमध्ये मोठा "ब्रेक' घेतला होता; मात्र ऑगस्टमध्ये दमदार सरी पडल्या. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात यंदा ९५७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Web Title: Meteorological Department Has Forecast Less Rain Pune City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..