
पुणे: स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दोन नवीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत, असे नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी जाहीर केले. या मार्गावरील 'बालाजीनगर' हे स्थानक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मान्यता मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली.