ajit pawar
sakal
पुणे - डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात पुणे मेट्रो मंजूर झाली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मेट्रोसाठी मदत दिली जात आहे, असे सांगत ‘मेट्रो आम्हीच आणली’ असा दावा करणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी आरसा दाखविला. कचरा, पाणीटंचाई, खड्डे, वाहतुकीची समस्या, प्रदूषित हवा, पर्यावरणाचे वाढते धोके, हे महापालिकेतील मूलभूत प्रश्न आहेत. याकडे दोन्ही महापालिकांमधील कारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले, अशी टीकाही पवार यांनी केली.