शिवजयंतीनिमित्त यशवंत फाउंडेशनकडून माढयातील शाळांमध्ये वह्या व चरित्रपर पुस्तकांचे वाटप

शिवजयंतीनिमित्त यशवंत फाउंडेशनकडून माढयातील शाळांमध्ये वह्या व चरित्रपर पुस्तकांचे वाटप

Published on

MDH26B05147
माढा ः येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनींना पुस्तके वाटप करताना देविदास खरात, यू.एफ. जानराव, रोहित शिंदे, संतोष जुगदार.

यशवंत फाउंडेशनकडून वह्या, चरित्रपर पुस्तकांचे वाटप

माढा, ता. २२ : छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माढ्यातील यशवंत फाउंडेशनने शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप केले.
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, मुलांची शाळा क्रमांक दोन व उर्दू शाळा या शाळांमध्ये यशवंत फाउंडेशनने शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप केले. महापुरुषांच्या चरित्राची शंभर पुस्तके भेट म्हणून दिली.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास खरात, संतोष जुगदार, सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश माळी यांनी केले. वह्यांचे वाटपप्रसंगी देविदास खरात, डॉ. यू. एफ. जानराव, गणेश मोरे, बापू राऊत, दत्तात्रय राऊत, शिवाजी माने, किरण पवार, रवी सरवदे , उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद परिचारक यांनी केले. आभार अमोल खरात यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com