म्हाडा, मंडळांच्या मुख्य खुर्च्या रिकाम्याच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

भाजप-शिवसेनेच्या काळातही पदे रिक्त
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन दोन वर्षे उलटली, तरी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) अद्याप अध्यक्ष आणि मंडळांना सभापती नेमता आलेले नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, किरकोळ कामांसाठी सर्वसामान्यांना म्हाडा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात म्हाडाच्या अध्यक्षपदांसह नऊ मंडळांच्या सभापतींची नेमणूक कित्येक वर्षे झालेली नव्हती. निवडणुकीचे वारे वाहू लागताच म्हाडाच्या मंडळांवर राजकीय पक्ष आपल्या मर्जीतील नेत्यांची नेमणूक करतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 2013 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सभापतिपदी युसुफ अब्राहम आणि राष्ट्रवादीने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सभापतिपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती केली होती; मात्र इतर बिनसरकारी सदस्यांची नेमणूक केली नव्हती. 2014 मध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने प्राधिकरणाच्या चार सदस्यांची नेमणूक केली; मात्र अध्यक्षपद रिक्त ठेवले. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन दोन वर्षे झाली, तरी सरकारने म्हाडाच्या अध्यक्षपदासह नऊ मंडळांचे सभापती आणि सदस्यांची पदे अद्यापही भरलेली नाहीत. म्हाडाचे अध्यक्षपद 13 वर्षांपासून रिक्त आहे. या पदासह मंडळाच्या सभापतिपदी आपली नेमणूक व्हावी, यासाठी भाजप-शिवसेनेतील नेते प्रयत्न करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही पदे भरावीत, अशी अपेक्षा हे नेते व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mhada chairman selection