म्हाडाच्या चार हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या चार हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर
Published on

पुणे, ता. २४ ः पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) चार हजार ४६२ घरांची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून, सोडतीचा निकाल १३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या दोन सोडतींमधील शिल्लक ५५८ घरांचाही यात समावेश केला आहे,’’ अशी माहिती ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सोमवारपासून (ता. २४) सुरू झाली. याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे उपस्थित होते. ‘‘या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील दोन हजार ९७१, तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील एक हजार ४९१ घरांचा समावेश आहे. पुणे महापालिका क्षेत्रात एक हजार ४६८, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार ४०६, तर पीएमआरडीए क्षेत्रात एक हजार ५८८ घरे उपलब्ध आहेत,’’ असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.
साकोरे म्हणाले, ‘‘ऑनलाइन अनामत रक्कम बँकेच्या आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे भरण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. त्यावर एक ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार असून, १३ ऑक्टोबरला सोडतीचा निकाल जाहीर होईल. जातपडताळणी आवश्यक असलेल्या अर्जदारांना घर मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत जातपडताळणीचे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com