माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३४ टक्के ; १८ शाळांचा निकाल शंभर टक्के ; प्रज्ञा चवरे ९८.४० गुण मिळवत माढा केंद्रात प्रथम ; गणितात मिळवले १०० पैकी १०० गुण

माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३४ टक्के ;  १८  शाळांचा निकाल शंभर टक्के ; प्रज्ञा चवरे ९८.४० गुण मिळवत माढा केंद्रात प्रथम ; गणितात मिळवले १०० पैकी १०० गुण
Published on

MDH26B05333
प्रज्ञा चवरे
---
MDH26B05332
श्रेया भांगे
---
MDH26B05331
श्रेया कवडे
---
माढा तालुक्यात मुलींनी मारली बाजी
एकूण निकाल ९२.३४ टक्के; २७ शाळांचे शंभर टक्के यश
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. ८ : माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३४ टक्के लागला आहे. तालुक्यातील २७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. माढ्यातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतील प्रज्ञा सुहास चवरे हिने ९८.४० टक्के गुण मिळवत माढा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तालुक्यातील ९१ शाळांमधून दहावीच्या परीक्षेस ५ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार २६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ४ हजार ८६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १ हजार ४६७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, १ हजार ७६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार २३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३९७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ८९.४४ टक्के तर मुलींचे ९६.११ टक्के असून, मुलींचे प्रमाण ६.६७ टक्क्यांनी अधिक आहे.
---
शाळानिहाय निकालाची टक्केवारी
उमा विद्यालय, मोडनिंब (८३.९६), सहकारमहर्षी गणपतराव साठे जि.प. हायस्कूल, माढा (९५.६७), नूतन विद्यालय, कुर्डुवाडी (९२.४७), जनता विद्यालय, टेंभुर्णी (५०), आंतरभारती विद्यालय, कुर्डुवाडी (८७.६८), विठ्ठलराव शिंदे ज्युनिअर कॉलेज व हायस्कूल, निमगाव (टें.) (९२.००), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डुवाडी (७६), गणेश विद्यालय, पिंपळनेर (९६.०७), श्री नंदिकेश्वर विद्यालय, उपळाई बुद्रूक (९८.४१), श्री कुर्मदास विद्यामंदिर, लऊळ (८७.१४), संजीवनी विद्यालय, मानेगाव (९७.२२), न्यू इंग्लिश स्कूल, रिधोरे (९४.३३), न्यू इंग्लिश स्कूल, घोटी (९५.८३), संत सावता माळी विद्यालय, अरण (९८.४८), वसंतराव नाईक विद्यालय, म्हैसगाव (७५), श्री खेलोबा विद्यालय, अंजनगाव खेलोबा (९०.६२), भैरवनाथ विद्यालय, आलेगाव बुद्रूक (९०), सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, माढा (९५.२३), जय जगदंबा विद्यालय, ढवळस (८२.५३), श्री विमलेश्वर विद्यालय, बेंबळे (८०.२८), कन्या प्रशाला, टेंभुर्णी (६४.७०), श्री विनायक विद्यालय, वरवडे (८५.२९), विष्णुपंत पाटील प्रशाला, उपळाई खुर्द (८८.८८), न्यू इंग्लिश स्कूल, पिंपळखुंटे (८९.७९), महात्मा फुले विद्यालय, वरवडे (९६.२५), श्री जगदंबा प्रशाला, धानोरे (९६.४२), न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी (९४.०१), भैरवनाथ हायस्कूल, केवड (९१.३०), श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, भीमानगर (६३.६३), श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर, अंजनगाव उमाटे (९४.४४), महाराणी लक्ष्मीबाई माध्यमिक कन्या प्रशाला, उपळाई बुद्रूक (७५), श्री एस. बसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला, मोडनिंब (९८.५९), स्व. सुगंधाताई पाटील विद्यामंदिर, चिंचोली (९८.१८), शरद विद्यालय, बारलोणी (९०.५६), श्री संत माणकोजी महाराज प्रशाला, वाकाव (९४.७३), न्यू इंग्लिश स्कूल, तुळशी (९४.६४), पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालय, भुताष्टे (९२.३०), विनायकराव पाटील विद्यालय, परिते (८०), मा. अजितदादा पवार हायस्कूल, शिराळ (७५), एम. एस. हायस्कूल, दहिवली (९६.१५), श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वडशिंगे (९७.०५), विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक विद्यालय, पडसाळी (९१.६६), न्यू इंग्लिश स्कूल, वेणेगाव (८६.२०), न्यू इंग्लिश स्कूल, वडशिंगे (९६.४२), संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यामंदिर, विठ्ठलवाडी (९३.७५), प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, कव्हे (९२.५०), विठ्ठलरावजी शिंदे विद्यालय, आढेगाव (८६.४८), विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, अंबाड, शिराळ (९५.३४), न्यू इंग्लिश स्कूल, उपळाई खुर्द (९३.८७), न्यू इंग्लिश स्कूल, टाकळी (९६.११), श्रीकृष्ण विद्यालय, वेताळवाडी (५५.५५), सहकारमहर्षी गणपतराव साठे विद्यालय, माढा (८०), श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी-हटकरवाडी (७०), कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, कन्हेरगाव (९०.३२), माध्यमिक आश्रमशाळा, माढा (७१.४२), माध्यमिक आश्रमशाळा, केवड (९५.२३), कर्मवीर लोकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय, उजनी (९२.८५), संघमित्र माध्यमिक विद्यालय, कुर्डुवाडी (९०.४७), जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा, टेंभुर्णी (५६.७१), माध्यमिक आश्रमशाळा, जामगाव (७९.६६), भाई-भाई विद्यालय, चांदज (६६.६६), श्री नागनाथ विद्यालय, कुर्डू (९२.५०), संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, भोगेवाडी (९७.२२), संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, लहू (६१.५३), संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, कुर्डुवाडी (८८.८८), पालवण माध्यमिक विद्यालय, पालवण (८०), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वडाचीवाडी (उ. बु.) (९०), महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी (९९.२३), नूतन इंग्लिश मीडियम स्कूल, कुर्डुवाडी (९६.६६), संजीवनी विद्यालय, मोडनिंब (९४.४४), ट्विंकल स्टार स्कूल, टेंभुर्णी (७१.४२), लक्ष्मी आनंद विद्यामंदिर (९७.०५).
---
चौकट
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
नवभारत विद्यालय, दारफळ; श्रीमान लक्ष्मणराव पवार विद्यालय, रोपळे कव्हे; न्यू इंग्लिश स्कूल, उंदरगाव; यशवंतराव मोहिते विद्यालय, खैराव; विनायकराव पाटील विद्यालय, विद्यानगर भोसरे-कुर्डुवाडी; बबनरावजी शिंदे माध्यमिक विद्यालय, अकोले खुर्द; स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पाटील प्रशाला, जामगाव; बबनरावजी शिंदे माध्यमिक विद्यालय, बैरागवाडी; मातोश्री माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव; प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, हरीनगर बेंबळे; शांती विनायक माध्यमिक विद्यालय, उपळाई बुद्रूक; जिव्हाळा संस्कार विद्यामंदिर, कुर्डुवाडी; आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डुवाडी; एस. आर. मोरे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अकोले खुर्द; श्री संत गजानन महाराज गुरुकुल, रोपळे; डॉ. नेताजी करळे विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आढेगाव; माईलस्टोन पब्लिक स्कूल, चिंचगाव.
---
चौकट
प्रज्ञा चवरेला गणितात शंभरपैकी शंभर
सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रज्ञा चवरे (९८.४० टक्के) प्रथम, श्रेया सोमनाथ भांगे (९६) द्वितीय तर श्रेया उमेश कवडे (९४.६०) तृतीय आली. प्रथम तीनही क्रमांक मुलींनी पटकावले. प्रज्ञा चवरे हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com