Mhalunge Road Repair: अपघातानंतर यंत्रणा पसार; म्हाळुंगेत महापालिकेकडून रस्तेदुरुस्ती सुरू; ‘सकाळ’कडून पाहणी

PMC Starts Road Repairs in Mhalunge After Accident: खड्डे, चिखल, सांडपाणी आणि रस्त्याची एक बाजू बंद असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, प्रशासनाकडून विविध कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.
Mhalunge Road Repair

Mhalunge Road Repair

esakal

Updated on

पुणे : म्हाळुंगे येथे अपघात झाला. त्या ठिकाणचा रस्ता समपातळीत नसल्याने रस्त्याच्या कडेने गाळ, माती जमा झाली आहे. भूसंपादनाच्या वादातून जागामालकांनी रस्त्याची एक बाजू बंद केली आहे. त्यामुळे एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच तेथे चेंबरसाठी खड्डा खोदला असून, दगड टाकले आहेत. हे काम महापालिकेचे नाही, पण ज्या शासकीय संस्थेकडून काम सुरू होते तेथील अभियंते आणि ठेकेदारांनी अपघातानंतर पळ काढला आहे. महापालिकेने जबाबदारी घेऊन काम सुरू केले, मात्र नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे, अशी गंभीर परिस्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com