म्हसवडला बुधवारी आठवडी बाजार रिंगावण पेठ यात्रा मैदानात भरणार

म्हसवडला बुधवारी आठवडी बाजार रिंगावण पेठ यात्रा मैदानात भरणार

Published on

म्हसवडला बुधवारी
आठवडी बाजार
म्हसवड, ता. ३ : येथील उद्या (बुधवार) भरत असलेला आठवडी बाजार रिंगावण पेठ मैदानात भरविला जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी दिली. पालिका कार्यालयासमोरील मैदानात प्रत्येक बुधवारी आठवडी बाजार भरत असतो. या मैदानात आठ मार्चला महिला दिनानिमित्त महिलांच्या बचत गटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले, तसेच इतर व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे या जागेतील आठवडी बाजार रिंगावण पेठ यात्रा मैदानात उद्या (बुधवार) बुधवारी भरविला जाणार आहे. आठवडी बाजारास येणारे विविध वस्तूंचे विक्रेते, ग्राहक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. सचिन माने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com