

MHTCET 2026 Registration
sakal
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग ( इंटिग्रेटेड) आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम/पीसीबी) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर, एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.