MHT-CET Exam 2026 : महाराष्ट्र सीईटी परीक्षा २०२६ संभाव्य वेळापत्रक जाहीर, एप्रिलमध्ये विविध परीक्षा

MHT CET 2026 Tentative Schedule Announced : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२६ मधील विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे; यात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण १७ परीक्षांचा समावेश आहे.
MHT CET 2026 Tentative Schedule Announced

MHT CET 2026 Tentative Schedule Announced

Sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्याप्रमाणे पहिली ‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम) परीक्षा ११ ते १९ एप्रिल आणि ‘एमएचटी-सीईटी’ (पीसीबी) परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान होणार आहे. एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी होणारी सीईटी सहा ते आठ एप्रिलदरम्यान होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com