मिया बाए तनिष्कच्‍या स्टोअरचे पुण्यात उद्घाटन

मिया बाए तनिष्कच्‍या 
स्टोअरचे पुण्यात उद्घाटन
Published on: 

पुणे, ता. ९ : शिवाजीनगरमधील जंगली महाराज रस्‍त्‍यावर ‘मिया बाए तनिष्क’च्या नव्या स्टोअरचे उद्‍घाटन टायटन कंपनी लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अजोय चावला यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मिया बाए तनिष्कचे रिटेल हेड संजय भट्टाचार्जी उपस्थित होते.
शिवाजीनगरमध्ये मॉडर्न हायस्कूलजवळील जंगली महाराज रस्‍त्‍यावर, मोटवानी चेंबर्समध्ये हे ९५६ चौरस फुटांचे नवे स्टोअर सुरू करण्यात आल्याने मियाच्या आधुनिक दागिन्यांचा अनुभव घेणे ग्राहकांसाठी अजून जास्त सहज सोपे झाले आहे. या स्टोअरमध्ये आधुनिक डिझाईन्स उपलब्ध आहेत. या डिझाईन्स रोजच्या घटना, स्वतःला अभिव्यक्त करण्याची इच्छा आणि व्यक्तिगत शैली यानुसार तयार करण्यात आल्या आहेत. याठिकाणी मियाच्या ‘ग्रँड नॉक्स’च्या बरोबरीनेच इतरही ज्वेलरी कलेक्शन्स उपलब्ध आहेत. स्टोअरमध्ये कॅरेटमीटर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या सोन्याची शुद्धता स्वतः पारखू शकतात. यामुळे या स्टोअरमध्ये ग्राहकांना खरेदीमध्ये अधिक पारदर्शकता व सुविधा मिळतील.
टायटन कंपनी लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अजोय चावला म्हणाले,‘‘शहरात हे आमचे ११ वे स्टोअर आहे. सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मिया बाए तनिष्क ११ ऑक्टोबरपासून फेस्टिवल ऑफर्स सुरू करणार आहे. यामध्ये डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंतची सूट दिली जाईल.’’
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com