Pune News : अतिसूक्ष्म उद्योगांना हवे धोरणात्मक पाठबळ; परिसंवादातील सूर

बाजारपेठेतील संधी, वित्तपुरवठा व कर्ज प्रक्रियेतील अडचणी आणि डिजिटल तंत्रसाधनांच्या अपुऱ्या वापरामुळे अतिसूक्ष्म उद्योग-व्यवसायांच्या विस्ताराला मर्यादा येत आहेत.
The report titled ‘State of Nano-Enterprises in Maharashtra’ was released on Monday.

The report titled ‘State of Nano-Enterprises in Maharashtra’ was released on Monday.

sakal

Updated on: 

पुणे - बाजारपेठेतील संधी, वित्तपुरवठा व कर्ज प्रक्रियेतील अडचणी आणि डिजिटल तंत्रसाधनांच्या अपुऱ्या वापरामुळे अतिसूक्ष्म उद्योग-व्यवसायांच्या विस्ताराला मर्यादा येत आहेत. त्यामुळे अतिसूक्ष्म उद्योग-व्यवसायांकरिता राज्याच्या पातळीवर धोरण आखणी, त्यांच्या व्यवसायवाढीसाठी पोषक वातावरण आणि स्थानिक बाजारपेठांशी जोडणी आवश्यक आहे, अशी भूमिका राज्यातील अतिसूक्ष्म उद्योगांच्या सक्षमीकरणावरील परिसंवादात मांडण्यात आली.

Loading content, please wait...