IT employees : आउटलुकच्या तांत्रिक बिघाडामुळे कर्मचाऱ्यांना कामातून मिळाला ब्रेक; मायक्रोसॉफ्टला दिवाळीची खरी भेट दिल्याबद्दल मीम्समधून धन्यवाद

Microsoft Outlook Outage, Corporate Employees, Viral Memes ; दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतलेल्या आयटी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना आउटलुकच्या तांत्रिक बिघाडामुळे अनपेक्षित निवांतपणा मिळाला. सात तासांहून अधिक सेवा विस्कळीत राहिल्याने सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल झाल्या.
Microsoft Outlook Outage, Corporate Employees, Viral Memes

Microsoft Outlook Outage, Corporate Employees, Viral Memes

esakal

Updated on: 

पारगाव, ता. १३: दिवाळीची सुट्टी नुकतीच संपली परंतु आयटी ( माहिती तंत्रज्ञान ) व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचार्यांनी दोन दिवसावर असलेल्या विकेंडची शनिवार रविवारच्या सुट्टीला जोडून वर्क फ्रॉम होम घेतले त्यात आज शुक्रवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे मायक्रोसॉफ्ट आउटलुक ची सेवा सात तासाहून अधिक काळ विस्कळीत झाल्यामुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामातून निवांतपणा मिळून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची चंगळ यामुळे सोशल मीडियावर मात्र मजेशीर मीम्सचा पाऊस पडला. एका व्हायरल पोस्टमध्ये आऊटलुक ला उद्देशून, ‘तुला जितका वेळ लागेल तितका वेळ घे, आम्ही तुझ्यासोबत आहोत!’ अशी मिम्स पहायला मिळाली

Loading content, please wait...