
पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गी लागण्याच्या दृष्टीने आखणी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या विमानतळासाठी भूसंपादनाची अधिसूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.