
पुणे : टोळक्याने दहशत माजवीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. शिवाजीनगर न्यायालयासमोरील तोफखाना भागात शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.