
पुणे : धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने कोयते, दांडकी उगारून दहशत पसरवून १८ वाहनांची तोडफोड केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रहिवाशांवर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. शहर परिसरात आठवडाभरात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. हडपसरमधील रामटेकडी, भवानी पेठ, तसेच कोंढवा भागातही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.