शिरूर - जास्त व चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या बहाण्याने एका परप्रांतिय तरूणीला येथे बोलावून तीला दोन दिवस एका लॉजमध्ये ठेवून सामुहीक अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला..संबंधित २२ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक श्रीमंदिलकर (रा. जुने शिरूर, ता. शिरूर), अजय माणिक घेगडे (रा. माठ, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर), दीपक दत्तात्रेय भोसले व अनिकेत दिलीप पठारे (दोघे रा. मावळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्या नगर), ऋषिकेश रामदास ढवळे व सागर राधू ढवळे (दोघे रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम (नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, अनिकेत पठारे याला पोलिसांनी अटक केली आहे..शिरूर न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मूळची छत्तीसड राज्यातील तरूणी सध्या चाकण येथे वास्तव्यास होती. संबंधित तरूणांनी तीच्याशी संपर्क साधून चांगल्या पैशांचे काम देण्याचे अमीष दाखवून आपल्या मोटारीतून शिरूरला आणले.बुधवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता येथील मार्व्हल इन लॉजवर नेऊन नशा येणारी पांढऱ्या रंगाची पावडर खायला दिली व तेथीलच एका खोलीमध्ये दोन दिवस आळीपाळीने अत्याचार केले. काल सायंकाळी या तरूणीने पोलिस मदत नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधून आपल्यावरील अत्याचाराची माहिती देत मदतीची याचना केली..रात्री उशिरा स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती कळताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी संबंधित लॉजवर जावून तरूणीची सुटका केली. तीने दिलेल्या फिर्यादीवरून सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, अनिकेत पठारे याला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी दिली..अत्याचाराच्या या घटनेनंतर संबंधित तरूण फरार झाले असून, पोलिस पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील याच लॉजवर दोघांना पकडून त्यांच्याकडून नऊ लाख रूपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले होते. दोन दिवसांपूर्वी अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी प्रकाशझोतात आलेल्या या लॉजवर सामुहीक अत्याचाराची गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.