
पुणे : ‘आयआयएम’ जम्मूचे अध्यक्ष आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे संस्थापक मिलिंद कांबळे यांची ‘ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदाचा कार्यभार सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारून औपचारिकरीत्या स्वीकारला.