

Centenary Celebration of Military Nursing Service (MNS) Held with Great Enthusiasm in Pune
Sakal
पुणे : सशस्त्र दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या ‘भारतीय लष्करी परिचर्या सेवे’च्या (मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस - एमएनएस) शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा सशस्त्र सेना वैद्यकिय महाविद्यालय येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ‘सेवेसोबत हास्य’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या या सेवेने गेल्या १०० वर्षांत समर्पण, व्यावसायिकता आणि सेवाभावाची परंपरा जपली आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.