ड्रॅगनफ्रूट विक्रीतून मिळविला लाखोंचा नफा

पाचारणेवाडीतील तरुण शेतकऱ्याचा प्रयोग; अर्ध्या एकरामध्ये घेतली आंतरपिके
dragan fruit
dragan fruitsakal

राजगुरुनगर : डेंग्यूसारख्या आजारावर गुणकारी ठरणाऱ्या, ड्रॅगनफ्रूट फळाच्या लागवडीचा प्रयोग राजगुरुनगरजवळील पाचारणेवाडी (ता. खेड) येथील तरुण शेतकरी गुरुदास पाचारणे यांनी यशस्वी केला आहे. त्यांनी अर्ध्या एकरामधील ड्रॅगनफ्रूटच्या विक्रीतून आतापर्यंत लाखोंचा नफा मिळविला आहे. यापुढील पंचवीस वर्षे असाचा नफा मिळणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

dragan fruit
मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुल रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद

पाचारणे यांनी आपल्या शेतात पारंपरिक पीक न घेता नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी ड्रॅगनफ्रूट पिकाची शेती करायचे ठरविले. कृषी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धा एकर क्षेत्रावर ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. त्याचप्रमाणे गवार, राजमा, भेंडी, सोयाबीन, वाटाणा, पपई , वालपापडी यांसारखी आंतरपिके घेण्याचे नक्की केले.

dragan fruit
इंदापूर : RTI मुळं त्रस्त झालेल्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

ड्रॅगनफ्रूटला पुण्या मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये याला मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारातही प्रति किलो २०० रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे पाचारणे यांनी अवघ्या २ वर्षांमध्ये ३ ते ४ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. या पीकलागवडीसाठी व वाढविण्यासाठी, त्यांना पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील केंद्रप्रमुख डॉ. डी.ए.सोनवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.व्ही. बगाडे, डॉ. एच. पी.सोनवणे व विद्यार्थिनी सानिका मच्छिंद्र खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

dragan fruit
महापालिकेचा उपअभियंता 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

"एकदाच केलेली भांडवल गुंतवणूक, तुलनेने कमी कष्ट, कमी पाणी, रासायनिक फवारणीचा शून्य खर्च यामुळे या फळपिकाचे उत्पादन त्यांना फायदेशीर ठरले. त्याचप्रमाणे पुढील २५ वर्षे येणारे फळ, वाढती मागणी व चांगला भाव मिळत असल्याने हा शेतकरी सध्या चांगली कमाई करीत आहे. जून ते नोव्हेंबर दरम्यान या झाडाला फळे येतात. झाडाला मोठी फुले येत असल्याने शेतकरी मधुमक्षिका पालनासारखा दुय्यम धंदाही करू शकतात."

- गुरुदास पाचारणे, ड्रॅगनफ्रूट उत्पादक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com