लॉकडाउनमुळे पिकात केला बदल...आज खेळतोय लाखात... 

हितेंद्र गद्रे
रविवार, 14 जून 2020

लॉकडाउनमध्ये अनेक शेतकरी मेटाकुटीला आले. अनेकांना हातातोंडाशी आलेली पिके ग्राहकाअभावी सोडून द्यावी लागली. मात्र, दौंड तालुक्यातील खुटबाव येथील राहुल पवार या शेतकऱ्याने वेळीच सावध होत

यवत (पुणे) : लॉकडाउनमध्ये अनेक शेतकरी मेटाकुटीला आले. अनेकांना हातातोंडाशी आलेली पिके ग्राहकाअभावी सोडून द्यावी लागली. मात्र, दौंड तालुक्यातील खुटबाव येथील राहुल पवार या शेतकऱ्याने वेळीच सावध होत शेतातील पीक पद्धतीत बदल केला. "मल्टी हार्वेस्टींग'ची पिके घेऊन त्यांनी यशस्वीपणे वेळ निभावून नेली. यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला असून, चाळीस शेतमजुरांचा रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. 

आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंग ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, अमोल कोल्हे यांची भूमिका

पवार यांनी या वर्षी कमी उत्पादन खर्च व कमी वेळेत येणारे झेंडूचे पीक घेण्याचे ठरवले होते. स्वतःच्या सहा एकर व भाडे तत्त्वावर घेतलेल्या चार एकर क्षेत्रावर झेंडू लावण्याचे नियोजन त्यांनी केले होते. लागवडीला सुरूवात करणार, तोच देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आले. झेंडूच्या फुलांना लग्न समारंभ, मंदिरे, पूजाविधी अशा ठिकाणी मागणी असते. मात्र, या सर्व गोष्टी किती काळ बंद राहणारस याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे पवार यांनी त्वरित निर्णय बदलला आणि झेंडूसाठी तयार केलेल्या बेडवर कारले, मिरची या "मल्टी हार्वेस्टींग' (एकाच पिकाची अनेकदा तोडणी) पिकांसोबत चार एकर क्षेत्रात खरबूज या पिकाची लागवड केली. एक दीड महिन्याच्या अल्प काळात येणाऱ्या या पिकांची लागवड त्यांना फायद्याची ठरली. 

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

लॉकडाउन अद्यापही सुरूच आहे. मात्र, पवार यांच्या शेतातील मिरची, कारले व खरबूज सध्या चांगलेच भाव खात आहे. मागील काही वर्षांपासून पवार यांनी स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. त्याचा फायदा त्यांना होत आहे. मिरचीला सरासरी प्रतिकिलो 45 रुपये, कारले 25 रुपये, तर खरबुजाला 18 रुपये भाव आहे. मागील पंधरा वीस दिवसांत त्याने सुमारे पस्तीस टन शेतमालाची विक्री केली असून, त्यातून साडेनऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील पंधरा वीस दिवसांपासून दररोज सुमारे सहाशे किलो मिरची आणि सातशे किलो कारल्यांची विक्री होत आहे. आजवर उत्पादन व विक्री केलेल्या मालामध्ये सुमारे नऊ टन मिरची, दहा टन कारले आणि सोळा टन खरबुजांचा समावेश आहे. 
 - राहुल पवार, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of rupees earned today due to crop changes due to lockdown