आम्ही नाही सुधारणार; कोरोनाबाबत काही नागरिक, कार्यकर्त्यांची मानसिकता 

आम्ही नाही सुधारणार; कोरोनाबाबत काही नागरिक, कार्यकर्त्यांची मानसिकता 
Updated on

पिंपरी - कोरोनाचे संकट देशासह शहरावर आहे, त्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करीत आहे; पण "काय होतंय,' असं म्हणत अनेक जण वावरत आहेत. यात राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह काही व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. 

"कोय होतंय?', "आम्ही कुठे परदेशातून आलोय?', "आमचा अंतर्गत कार्यक्रम आहे' असं म्हणत काही जण काहीच झालं नसल्यासारखं वावरत आहेत. यास राजकीय पदाधिकारीही अपवाद नाहीत. एका नगरसेवकाने निगडी- प्राधिकरण भागात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्याचा मोठा गाजावाजा केला. प्रमुख पाहुणे बोलावले, भाषणबाजी केली, विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना बोलावलं. 19 जण प्रमुख पाहुणे होते. गुरुवारीही त्यांनी प्रभागात मास्क व सॅनिटायझरचं वाटप केलं, गर्दी जमवली, "कोरोनाबाबत जनजागृती'वर भाषण ठोकलं आणि प्रशासन व सरकारने सांगितलेल्या "गर्दी करू नका', "सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करा', "पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमावाने थांबू नका' या सूचनांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धीचा खटाटोप केला. 

स्वयंप्रसिद्धीचा खटाटोप 
एका राजकीय पक्षाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर झाली. कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर कार्यकारिणीवर वर्णी लागलेल्यांनी मोठमोठे फ्लेक्‍स लावले, त्यावर समर्थकांच्या छबी उमटवून प्रसिद्धी मिळवली. शब्दरूपी "शुभेच्छां'चा वर्षाव फ्लेक्‍सद्वारे दाखवला. मात्र, कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी, जनजागृती याबाबत एक अक्षरही त्यावर नव्हते. वाढदिवस, निवड अशा शुभेच्छा देण्यासाठी जागोजागी फ्लेक्‍स उभारणारे कार्यकर्ते व पदाधिकारीही सध्या दिसेनासे झाले आहेत. काही जण केवळ प्रसिद्धी माध्यमांद्वारे झळकण्यासाठी पत्रकबाजी करीत आहेत. 

थुंकणाऱ्यांवर कारवाई 
थुंकी व शिंकेद्वारे कोरोनाचा प्रसार होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहन महापालिकेने केलेले आहे, तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकले जात आहे. अशा व्यक्तींवर आरोग्य विभागातर्फे 150 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरू आहे. आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्यक्तींकडून दंड वसूल केला आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिलकुमार रॉय यांनी सांगितले. 

पान ठेले बंद करा : डॉ. शेलार 
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी ठेवलेल्या घंटागाडीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करता येईल. याबाबतची पत्रके प्रत्येक घरात पोचतील व नागरिकांपर्यंत माहिती जाईल. शहरातील पान ठेले, टपऱ्या व गुटखा, तंबाखू विक्री बंद केली पाहिजे, त्यामुळे नागरिक कुठेही थुंकणार नाहीत, थुंकणाऱ्यांची संख्या कमी होईल, असे नवी सांगवीतील डॉ. देविदास शेलार यांनी सुचविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com