Video :...म्हणून म्हणतात 'अपना भिडू, बच्चू कडू', तमिळनाडूतही त्यांचा बोलबाला

सागर दिलीपराव शेलार
Thursday, 3 September 2020

मंत्री बच्चू कडू यांचा कार्यक्रम सुरु असताना एक महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जो प्रसंग सांगितला त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. 

पुणे : मंत्री बच्चू कडू यांचा कार्यक्रम सुरु असताना एक महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जो प्रसंग सांगितला त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. 

मंत्री बच्चू कडू यांचा कार्यक्रम सुरु होता, त्या ठिकाणी एक महिला आल्या आणि त्या कथा सांगू लागल्या, ३, ४ वर्षापुर्वी तामिळनाडू (वेल्लुर) येथे शिवजयंती व्याख्यानाकरीता मंत्रीसाहेब यांना आमंत्रीत केले होते. त्या वेळेस ते साधे आमदार होते. ते आले त्यांचे व्याख्यान सुरु झाले. माझ्यापुढे चिंता होती माझ्या मुलाच्या शस्त्रक्रियेची. माझ्या मुलावर डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करावयास सांगितले होते, नाहीतर त्याचे प्राण वाचणार नाहीत असे सांगितले. यामुळे माझे ह्रदय त्याच्या शस्त्रक्रियेसाठी तीळतीळ तुटत होते. अशा वेळी मी धाडस केले आणि त्या कार्यक्रमात माझ्या मुलाबद्दल सांगितले. त्याठिकाणी असणार्‍या सर्वाच्याच डोळ्यात पाणी आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आमदार साहेबांनी लगेचच उपस्थितांनी काय असेल ती मदत करण्याची विनंती केली. आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन तेथे असणार्या सर्वांनीच मदत केली. 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी 3 लाख रुपये जमा झाले. ते आमदार साहेबांनी माझ्या हवाली केले, मला त्यावेळी दोन लाख रूपयेच हवे होते. पण आमदार साहेबांनी सर्व पैसे मला दिले व म्हणाले राहू द्या उपचाराला लागू शकतात. या मदतीमुळे माझा मुलगा वाचू शकला. मला कळत नाही त्यांचे आभार कसे मानू. असे म्हणताच त्यांचे व उपस्थितांचेही डोळे पाणावले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रसंगाबाबत आमदार कडू म्हणाले, ३, ४ वर्षापुर्वी तामिळनाडू (वेल्लुर) येथे शिवजयंती व्याख्यानाकरीता मला आमंत्रीत करण्यात आले होते. गलाई समाज बांधवांनी हा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे छोटेसे पाॅम्पलेट त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघून या ताई तिथे आल्या मला भेटल्या. मुलाच्या शस्त्रक्रियेकरीता त्यांना मदत हवी होती. मी आवाहन केल्यानंतर फक्त 10 मिनटात 3 लाख रक्कम जमा झाली. कालपरवा त्या ताई अकोला येथे परत भेटल्या त्यावेळेस झालेल्या शस्त्रक्रियेने त्यांचा मुलगा हा आज सुखरूप आहे हे कळाल्यावर समाधान वाटले.

कडू हे नेमके कोेण...

सलग चौथ्यांदा ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून कडू निवडूण आले आहेत. ते सध्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. 
आपल्या दिलदार व थेटपणे भूमिका घेण्याच्या स्वभावामुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी अनेक गरिब घरातील मुलामुलींची लग्ने लावून दिली आहेत. अंत्यत साधी राहणी उच्च विचारसरणी अवलंबणारा हा मंत्री होय. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच ज्याप्रमाणे 11 वेळेस विधानसभेत जाणारे गणपतराव देशमुख हे देखील साध्या राहणीमानामुळे परिचित होते तसेच आमदार कडू देखील आहेत. ते आजदेखील आपल्या गावी एका साध्या घरात राहतात. या वागण्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अनेक अपंग व्यक्तींचे प्रश्न त्यांनी तडीस लावले आहेत, प्रसंगी त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकर्यांच्या अंगावर देखील ते धावून गेले आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्यावर अनेक केस सुरु आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister bacchu kadu helps a poor family in tamilnadu