Minister Chandrakant Patilesakal
पुणे
केवळ दैव बलवत्तर, चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले! भरधाव गाडीची ताफ्यातील मोटारीला धडक, सुरक्षारक्षक जखमी
Minister Chandrakant Patil : धडक देणाऱ्या मोटारीत दोन युवकांसह तीन युवती होत्या. त्यांनी मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Summary
कोथरूड परिसरातील एका २५ वर्षीय मोटर चालकाने मंत्री पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली. मोटर चालक युवक सध्या शिक्षण घेत आहे.
पुणे/कोथरूड : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मोटारीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे. धडक देणाऱ्या मोटारीत दोन युवकांसह तीन युवती होत्या. त्यांनी मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे.