इंदापूर - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. प्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान या प्रकरणामुळे किमान यापुढे तरी इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.